तरुणाईला अमली पदार्थांपासून रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य : पी. व्ही. स्नेहा
बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. यावेळी बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, व्हीटीयूचे एम. एस. सपना आदी उपस्थित होते. कुलसचिव प्रा. बी. रंगस्वामी यांनी स्वागत केले. एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. प्रल्हाद राठोड यांनी आभार मानले. पी. व्ही. स्नेहा यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थविरोधी शपथ दिली. अमलीपदार्थ विक्रीचे जाळे शोधण्यापेक्षा तरुणाईमध्ये त्याच्या दुष्परिणामांविषयी जागृती करून त्याचा वापर थांबविणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळेच पोलीस दलाच्यावतीने सर्वत्र जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जे अमलीपदार्थांच्या आहारी जातात, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते. त्यांच्या आई-वडिलांचाही स्वप्नभंग होतो. समाजात पावलोपावली अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे अमलीपदार्थांच्या व्यसनापासून तरुणाईला रोखणे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी तरुणाईला अमली पदार्थांपासून रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य : पी. व्ही. स्नेहा
तरुणाईला अमली पदार्थांपासून रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य : पी. व्ही. स्नेहा
बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. यावेळी बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, व्हीटीयूचे एम. एस. सपना आदी उपस्थित होते. कुलसचिव प्रा. बी. रंगस्वामी यांनी स्वागत केले. एमबीए […]