राशिभविष्य

विवाह  गुण मिलन?   चुलीत घाला…  अचानक या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे  गुण मिलनाबद्दल  असलेले गैरसमज आणि त्यामुळे तुटलेली नाती. आजकाल घडणारा सर्रास प्रकार हा साधारणपणे असा असतो.  मुलगा किंवा मुलगी उपवर झाली की योग्य स्थळासाठी  शोधाशोध चालू होते. बायोडेटा तयार केला जातो. वेगवेगळ्या ग्रुपवरती तो पाठवला जातो. एखादे स्थळ आले की इंटरनेटवरती दोघांचीही जन्मतारीख, जन्मवेळ, […]

राशिभविष्य

विवाह  गुण मिलन?   चुलीत घाला…
 अचानक या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे  गुण मिलनाबद्दल  असलेले गैरसमज आणि त्यामुळे तुटलेली नाती. आजकाल घडणारा सर्रास प्रकार हा साधारणपणे असा असतो.  मुलगा किंवा मुलगी उपवर झाली की योग्य स्थळासाठी  शोधाशोध चालू होते. बायोडेटा तयार केला जातो. वेगवेगळ्या ग्रुपवरती तो पाठवला जातो. एखादे स्थळ आले की इंटरनेटवरती दोघांचीही जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण  घालून  किती गुण मिळतात ते पाहिले जाते. 18 पेक्षा जास्त असतील  तर पुढे जातात, नसतील तर नकार कळवतात. काही वेळा गल्लाभरू ज्योतिषाकडे  जातात, मग तो ज्योतिषी विचारतो मुलाचे जन्म नाव काय? मुलीचे जन्म नाव  काय? यावरून पंचांगात असलेल्या टेबलमध्ये जन्म नावाप्रमाणे आलेले अक्षर- नक्षत्र शोधून  किती गुण मिळतात हे सांगितले जाते. आणि तेवढ्याच बेसिसवरती  लग्न करायचे की नाही करायचे हे ठरवले जाते. यापेक्षा मोठी घोडचूक दुसरी नाही. बऱ्याच वेळेला मॅट्रिमोनियल साईटवरती गुण मिलनाचा कॉलम असतो. तिथे गुण बघितले जातात. यामुळे कित्येक उपवर मुला-मुलींचे विवाह होता होता राहिले आहेत. जे केवळ गुण मिलनावरून पत्रिका जुळते की नाही हे सांगतात त्यांनी विचार करण्याची गरज आहे. आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव असणे केवळ आवश्यकच नाही तर अनिवार्यदेखील आहे. आपल्या एका शब्दामुळे एका जोडप्याचा होणारा सुखाचा संसार मोडला तर हे किती मोठे पाप आहे आणि किंबहुना गुन्हा आहे याची साधी जाणीवसुद्धा लोकांना असू नये? इथे कुणालाही दुखवायचा उद्देश नाही तर या गुणमीलनाबद्दल, त्यामध्ये असलेल्या चांगल्या आणि निऊपयोगी गोष्टींबद्दल तुम्हाला कळावे, मंगळ, एकनाडसारख्या अवास्तव महत्त्व दिल्या गेलेल्या फालतू संकल्पनांबद्दलदेखील तुम्हाला माहिती मिळावी म्हणून हा लेख लिहीत आहे. एक साधे उदाहरण तुम्हाला सांगतो. सीतेचे स्वयंवर झाले. स्वयंवरामध्ये अनेक राजे आले होते. स्वयंवराला बोलवण्यापूर्वी त्यांच्या कुंडल्या पाहून मग त्यांना बोलावण्यात आले होते का? रामाचे आणि सीतेचे गुण मिलन केल्याचा एक तरी पुरावा रामायणात आढळतो का? महाभारतात द्रौपदीचा विवाह पाच पांडवांशी झाला. पाचही पांडवांबरोबर द्रौपदीच्या कुंडलीचे गुण मिलन केले गेले होते का? कृष्णाला 1008 बायका होत्या. त्या सगळ्यांची लग्ने करताना कुंडली जमवली होती का? मुळात लक्षात घ्या की वेदिक काळामध्ये कुंडली मिलनाचा प्रकारच नव्हता. त्याकाळी साधारण उत्तरायणमध्ये शुभ मुहूर्त पाहून विवाह संपन्न केला जायचा. त्यानंतर साधारण स्मृती आणि पुराणांच्या काळामध्ये अपराविद्येच्या स्वरूपात ज्योतिष शास्त्राच्या विकासाबरोबर  कुंडली मिलन हा प्रकार अस्तित्वात आला. त्यातल्या त्यात गुण मिलन कधी सुरू झाले. याबद्दल अनेक वाद आहेत आणि हा विषय संशोधनात्मक आहे. विवाह ठरवताना केवळ गुणांचा विचार करणे हे तद्दन मूर्खपणाचे आहे यात वाद नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे 10 पेक्षा कमी गुण मिळून सुद्धा  55-60 वर्षाचा सुखी संसार झाला आहे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर इंदिरा गांधींचे प्रमुख सचिव आणि तमिळनाडू, महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल असलेले स्वर्गीय पी.सी.अलेक्झांडर आणि त्यांच्या पत्नीचे केवळ बारा गुण मिळत होते आणि असे असूनसुद्धा त्यांनी साठ वर्षे सुखाने संसार केला.
 
मेष
मन चंचल होण्याचा संभव आहे. ते चांगल्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कलेमध्ये अथवा कलाकौशल्यामध्ये किंवा एखादी विद्या शिकण्यात मनाला गुंतवा. या सर्वामध्ये आपल्याला नक्की यश मिळण्याची शक्मयता आहे. आपल्या जोडीदाराचे आपल्याला नक्की सहकार्य मिळेल. आपल्या प्रियकराचे/प्रेयसीचे सहकार्य मिळेल. प्रयत्न करा.
उपाय: मुक्या जनावरांना खाऊ द्या.
वृषभ
वाणीवर संयम ठेवा. आपल्या वाणीने आपल्याच माणसांचे मन दुखावले जाईल असे बोलू नका. बाकी कुटुंबासमवेत वेळ छान जाईल. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्मयता आहे. देवघेवीच्या व्यवहारात फायदा होण्याची शक्मयता आहे. पण व्यवहार सांभाळून व सुज्ञतेने करावा.
उपाय: गुरुची उपासना करा.
मिथुन
सध्या प्रवासाचे दिवस आहेत. छान सहलींचे आयोजन करण्यात सहभागी होण्याची शक्मयता आहे. प्रवासाची छान आखणी होईल. पण नसते धाडस नको. सुरक्षित ठिकाणी आणि सुरक्षितपणे प्रवास करा. व प्रवासाचा आनंद लुटा. आपल्या आयोजनावर लोक खुश होतील. सहलीबरोबर खाण्याचाही आनंद लुटाल. हा आठवडा आपल्याला आनंद देऊन जाईल.
उपाय: बाहेर जाताना कपाळावर केशरी गंध लावा.
कर्क
मातृ देवो भव या उक्तीप्रमाणे या आठवड्यात आपल्याला मातेची सेवा करावी लागण्याची शक्मयता दिसते. तिचा सहवास मिळून आपल्याला सुख समाधान मिळेल. आपण मिळवत असलेल्या विद्येत आपल्याला चांगल्या मार्कांनी यश मिळण्याची शक्मयता आहे. घर बांधण्याचा अथवा घेण्याचा विचार मनात येऊ लागेल. हरकत नाही. सगळ्याचे व्यवस्थित प्लॅनिंग करा.
उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.
सिंह
मुलांच्या संदर्भातील काही चांगली बातमी कानावर येण्याची शक्मयता आहे. ज्यांच्या घरी बाळाच्या आगमनाची वाट पहात आहेत त्यांना त्या संदर्भात आनंदाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. आपण काही नवीन शिकण्याच्या विचारात असाल अथवा शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर शिकण्यास काहीच हरकत नाही. यश मिळेल.
उपाय: नामस्मरणात वेळ घालवा.
कन्या
तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. किरकोळ तक्रारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा येईल. सांभाळून रहा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि स्वत:ला सांभाळा. तब्येतीसाठी थोडा पैसा खर्च करावा लागला तरी चालेल. पण घट्ट रहा. चिंता शरीर आणि मन दोन्ही पोखरते. चिंता करू नका. चोरापासून सावध रहा.
उपाय: हनुमान चालीसा वाचा.
तूळ
विवाहेच्छुकांना चांगला जोडीदार मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. स्वतंत्र व्यवसायात बुद्धीच्या जोरावर प्रगती कराल. पण प्रगती करताना कुठे कुणाशी पंगा घेऊ नका आणि कुणाशी वादावादी करू नका. या आठवड्यात कदाचित एखादी हरवलेली वस्तू मिळण्याची शक्मयता आहे. मन चंचल होण्याची शक्मयता आहे. मनावर अंकुश ठेवा.
उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
वृश्चिक
कोणत्या तरी स्त्रीकडून आपल्याला धनलाभ होण्याची शक्मयता आहे. मात्र तो  योग्य मार्गाने मिळायला हवा. गैरमार्गाने जाल तर गोत्यात याल. वाहन मात्र जपून चालवा. कोणती तरी मानसिक चिंता सतत आपल्याला त्रास देत राहण्याची शक्मयता आहे. चिंता शरीर जाळी, त्यामुळे शक्मयतो सर्व चिंता आणि काळज्या परमेश्वरावर सोपवून द्या आणि तब्येतीची काळजी घ्या.
उपाय: दर मंगळवारी मारुतीला 11 प्रदक्षिणा घाला.
धनू
आपल्या हातून काही धार्मिक कार्य घडण्याची शक्मयता आहे. असे पुण्यदायी कार्य व परोपकार करून पुण्यसंचय साठवून घ्या. जीवन सार्थकी लावा. वडिलांची काळजी घ्या. वडिलांचे व घरातील इतर वृद्ध मंडळींचे आशीर्वाद घ्या. दूरच्या प्रवासाची कदाचित तीर्थयात्रेची आखणी करून ती यशस्वी करून दाखवाल. देवदर्शना बरोबर संतदर्शनही घडण्याची शक्मयता आहे. आठवडा छान जाईल.
उपाय: कुलदेवतेचे दर्शन घ्या.
मकर
आपल्या उद्योगाची प्रगती होण्याची चिन्हे आहेत. वडिलांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने आपली भरभराट होण्याची शक्मयता आहे. वडिलांच्या सल्ल्यानुसार वागा. त्यांचे अनुभव तुमच्या नक्की उपयोगाला येतील. नोकरीत असाल तर तिथे तुमच्या पदोन्नतीची शक्मयता आहे. अथवा पगारवाढीची शक्मयता आहे. मान, प्रतिष्ठा लाभेल. समाजातील तुमचा दर्जा उंचावेल.
उपाय: दत्तगुरुची उपासना करा.
कुंभ
वडील भावंडांच्या सहवासात आणि मित्रांच्या सहवासात हा आठवडा छान जाईल असे दिसते. सभा समारंभात सहभागी व्हाल. त्यातून तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्मयता आहे. पण या सगळ्यातून कुटुंबाकडे दुर्लक्ष नको. त्यांना व्यवस्थित खुश ठेवा, जेणेकरून ते नाराज होणार नाहीत. महत्त्वाकांक्षेकडे वाटचाल करताना थोडेफार धाडस करावे लागेल असे वाटते.
उपाय: तहानलेल्याला पाणी द्या.
मीन
खर्चावर नियंत्रण ठेण्याची गरज आहे. परदेश प्रवासाला जाण्याची शक्मयता आहे. त्यासाठी खर्च होत असेल तर अवश्य होऊ दे आणि तो होईलच. पण अपव्यय शक्मयतो टाळावाच. वाहन जपून चालवा. रहदारीचे नियम व्यवस्थित पाळा. उन्हाने पायाचे तळवे दुखण्याची शक्मयता आहे. शक्मयतो उन्हात गरजेशिवाय बाहेर पडू नका. तब्येतीला सांभाळण्याची गरज आहे.
उपाय: महालक्ष्मीची दर शुक्रवारी मनोभावे पूजा करा.