हिरो फिनकॉर्पचा येणार आयपीओ

हिरो फिनकॉर्पचा येणार आयपीओ

आयपीओमार्फत 400 कोटी उभारण्याची तयारी
वृत्तसंस्था /मुंबई
भारतातील दुचाकी वाहन निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्पची सहकारी कंपनी हिरो फिनकॉर्प आपला आयपीओ बाजारात आणणार असल्याची माहिती मिळते आहे. कंपनीने ही माहिती गुरुवारी शेअरबाजाराला दिली आहे. हिरो फिनकॉर्प लिमिटेड यांचा आयपीओ सादर होणार असून याअंतर्गत कंपनी जवळपास 400 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते. ताजे समभाग सादरीकरणासोबतच ऑफर फॉर सेलची मदत कंपनी घेणार आहे. ऑफर फॉर सेलकरीता सध्याचे भागधारक, समभागधारक यात गुंतवणूक करु शकतात. तर ताज्या समभागांमध्ये सामान्य गुंतवणूकदार पैसे लावू शकतात. हिरो फिनकॉर्पला आयपीओमधून 400 कोटी रुपये उभारण्यासाठी संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे. आयपीओ आणण्याची माहिती असली तरी कंपनी सदरचा आयपीओ बाजारात कधी दाखल करणार आहे यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. बाजारातील परिस्थिती, सेबीकडून मंजुरी यासंदर्भातले चित्र स्पष्ट झाल्यानंतरच कंपनी आयपीओ बाजारात कधी दाखल करायचा याबाबतचा निर्णय घेणार आहे.