कारवार किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कारवार, अंकोला, कुमठा, भटकळसह इतर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत होता. तथापि मंगळवारी रात्रीपासून दमदार पावसामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. किनारपट्टीवरील दक्षिण भागातील भटकळ आणि कुमठा तालुक्यात जोरदार […]

कारवार किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कारवार, अंकोला, कुमठा, भटकळसह इतर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत होता. तथापि मंगळवारी रात्रीपासून दमदार पावसामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. किनारपट्टीवरील दक्षिण भागातील भटकळ आणि कुमठा तालुक्यात जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भटकळ तालुक्यात अनेक ठिकाणी घरे जलमय झाली आहे. भटकळ तालुक्यातील हेबळे येथील देवस्थानला आणि मुर्डेश्वर येथील अय्यप्पा स्वामी मंदिराला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. भटकळ केएसआरटीसी बसस्थानकात पाणी शिरल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सिद्धापूरला जोडणारा रस्ता जलयम
किनारपट्टीवरील कुमठा आणि घाटमाथ्यावरील सिद्धापूरला जोडणारा रस्ता जलमय झाला असून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी सकाळी पडलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 97 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पुढील काही दिवस पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. किनारपट्टीवर अरबी समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळला असून मासेमारी बांधवांना मासेमारीसाठी समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात 570 मि. मी. पावसाची नोंद
बुधवारी सकाळी पडलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण सुमारे 570 मि.मी. आणि सरासरी 47.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आजअखेर सर्वाधिक 850 मि.मी. पावसाची नोंद भटकळ तालुक्यात झाली आहे. तर याच कालावधीत सर्वात कमी पावसाची नोंद मुंदगोड तालुक्यात 146.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.