ज्ञानवापीसंबंधी आज ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवार, 1 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 26 फेब्रुवारीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या याचिकेवर यावेळी युक्तिवाद होणार आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने समितीची याचिका फेटाळून लावली होती.
जिल्हा न्यायालयाच्या 31 जानेवारीच्या हिंदूंना तळघरात प्रार्थना करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने आव्हान दिले होते. मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदू पुजारी मूर्तींसमोर प्रार्थना करू शकतात, असा निर्णय जिल्हा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी मशीद समितीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळताना महत्त्वपूर्ण निरीक्षणही नोंदवले होते.
Home महत्वाची बातमी ज्ञानवापीसंबंधी आज ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी
ज्ञानवापीसंबंधी आज ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवार, 1 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 26 फेब्रुवारीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या याचिकेवर यावेळी युक्तिवाद होणार आहे. […]