एचडीएफसी बँकेने ‘या’ व्यवहारासाठीचा बदलला नियम

एचडीएफसी बँकेने ‘या’ व्यवहारासाठीचा बदलला नियम

मुंबई :
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक आहे. जर या बँकेत आपण ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे. कारण आता बँकेच्या ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी युपीआय व्यवहारांसाठी मजकूर संदेश मिळणार नाहीत. बँकेने हा निर्णय घेतला असला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होणार नाही. मात्र पुढील महिन्याच्या 25 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे.
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 25 जून 2024 पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेमध्ये काही बदल करण्यात येत आहेत. आता तुम्ही यूपीआयद्वारे एखाद्याला 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तरच एसएमएस अलर्ट नसेल. त्याचप्रमाणे 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. ईमेल अलर्टमध्ये काय आहे ईमेल अलर्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.