अदानींसोबत व्यवहार नाही : पेटीएमकडून खुलासा

अदानींसोबत व्यवहार नाही : पेटीएमकडून खुलासा

पेटीएमचे सीईओ शेखर शर्मा यांचे स्पष्टीकरण : समभाग 5 टक्क्यांनी मजबूत
नवी दिल्ली :
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडने स्पष्टीकरण दिले आहे की ती अदानी समूहासोबत आपला हिस्सा विकण्यासाठी बोलणी करत नाही. याअगोदरच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये गौतम अदानी यांची भेट घेऊन हिस्सेदारी व्यवहार निश्चित केल्याचे म्हटले होते.
वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडने एक निवेदन जारी केले की -‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हे सर्व खोटं आहे आणि कंपनी या संदर्भात कोणत्याही चर्चेत सहभागी नाही. अदानींसोबत हिस्सेदारी व्यवहाराबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही.
याचदरम्यान या वृत्तानंतर पेटीएमचा शेअर 29 मे रोजी 5 टक्के वाढताना दिसला आहे. तो 7.10 रुपये (4.99 टक्के) वाढून 359.45 रुपयांवर राहिला होता.
पेटीएमचा तोटा 228 टक्क्यांनी वाढला
वन 97 कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर 550 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा तोटा 167.5 कोटी रुपये होता.