नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हंपी, वैशाली, प्रज्ञानंद,भारताचे आव्हानवीर
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर, नॉर्वे
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, कोनेरू हंपी, वैशाली रमेशबाबू 27 मेपासून येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. 7 जूनपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेला बुद्धिबळमधील विम्बल्डन म्हणून ओळखले जाते. जागतिक क्रमवारीतील मानांकनानुसार या स्पर्धेसाठी खेळाडूंना निमंत्रित केले जाते. नुकत्याच झालेल्या सुपरबेट रॅपिड, ब्लिट्झ स्पर्धेत चौथे स्थान मिळवित शानदार कामगिरी केलेल्या प्रज्ञानंदच्या येथील कामगिरीवर सर्वांचे बारीक लक्ष असणार आहे. या स्पर्धेची ही बारावी आवृत्ती असून प्रज्ञानंद हा एकमेव भारतीय पुरुष खेळाडू त्यात सहभागी झाला आहे. जागतिक अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन, जागतिक तिसरा मानांकित हिकारु नाकामुरा, विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेन यांचाही येथील स्पर्धेत सहभाग आहे. 2022 मध्ये झालेल्या नॉर्वे चेस आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेचे जेतेपद प्रज्ञानंदने मिळविले होते. विशेष म्हणजे त्या स्पर्धेच्या नऊही फेऱ्यांत तो अपराजित राहिला होता. 7.5 गुण घेत त्याने जेतेपद पटकावले होते.
महिला विभागात भारताची द्वितीय मानांकित कोनेरू हंपी, 14 वी मानांकित वैशाली यांच्यासह वर्ल्ड चॅम्पियन चीनची जु वेनजुन, तिचीच देशवासी लेई टिंगजी या नामवंतांचा सहभाग आहे. मात्र अव्वल शंभरमधील अनेकांना त्यात स्थान मिळालेले नाही. स्त्राr-पुरुष समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आयोजकांनी यावेळपासून नॉर्वे चेस महिला बुद्धिबळ स्पर्धा सुरू करणार असून त्यांनाही समान बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने स्वागत केले आहे.
Home महत्वाची बातमी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हंपी, वैशाली, प्रज्ञानंद,भारताचे आव्हानवीर
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हंपी, वैशाली, प्रज्ञानंद,भारताचे आव्हानवीर
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर, नॉर्वे ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, कोनेरू हंपी, वैशाली रमेशबाबू 27 मेपासून येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. 7 जूनपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला बुद्धिबळमधील विम्बल्डन म्हणून ओळखले जाते. जागतिक क्रमवारीतील मानांकनानुसार या स्पर्धेसाठी खेळाडूंना निमंत्रित केले जाते. नुकत्याच झालेल्या सुपरबेट रॅपिड, ब्लिट्झ स्पर्धेत चौथे स्थान मिळवित शानदार […]