विदेशी चलन साठा सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली : देशाचा विदेशी चलन साठा सलग दुसऱ्या आठवड्यात सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. 7 जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 4.3 अब्ज डॉलर्सने वाढून 655.81 डॉलरवर विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. विदेशी चलन साठ्याची ही सर्वोच्च पातळी असल्याचेही समजते. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. 30 मे ला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन […]

विदेशी चलन साठा सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली :
देशाचा विदेशी चलन साठा सलग दुसऱ्या आठवड्यात सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. 7 जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 4.3 अब्ज डॉलर्सने वाढून 655.81 डॉलरवर विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.
विदेशी चलन साठ्याची ही सर्वोच्च पातळी असल्याचेही समजते. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. 30 मे ला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 4.83 अब्ज डॉलर्सने वाढत 651.51 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. सात जूनला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता 3.773 अब्ज डॉलर्सने वाढून 576.33 अब्ज डॉलरवर पोहोचला होता.
सुवर्ण साठ्यातही वाढ
याचबरोबर देशाच्या सुवर्ण साठ्यामध्ये सुद्धा सदरच्या आठवड्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार देशाचा सुवर्ण साठा 0.481 कोटी डॉलर्सने वाढून 56.9 अब्ज डॉलरवर पोहोचला.