मोटोरोला एज 50 अल्ट्रा आज होणार लॉन्च

मोटोरोला एज 50 अल्ट्रा आज होणार लॉन्च

एआयचे वैशिष्ट्या शक्य: किंमत 31 ते 36 हजाराच्या आत
वृत्तसंस्था/ मुंबई
स्मार्टफोन कंपनी मोटोरोला यांचा एज 50 अल्ट्रा हा स्मार्टफोन 18 जूनला लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. टॉप एंड मॉडेलच्या स्वरूपामध्ये स्मार्टफोन सादर केला जाणार असून यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वैशिष्ट्या असू शकते असेही म्हटले जात आहे.
मोटोरोला एज 50 अल्ट्रा या स्मार्टफोनबाबत मिळालेल्या माहितीनुसार 6.7 इंचाचा पीओएलइडी डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. इन डिस्प्ले फिंगर्स प्रिंट स्कॅनर सोबतच याला गोरीला ग्लास विक्टसचे संरक्षण असणार आहे. धूळ आणि पाणी रोधक असा हा स्मार्टफोन असणार असून स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट यामध्ये दिली जाणार आहे. 125 डब्ल्यूची वायर्ड आणि 50 डब्ल्यूची फास्ट चार्जिंगची सुविधा यात असेल.
वायरलेस पॉवर शेरिंगची सुविधा
स्मार्टफोनमध्ये 10 डब्ल्यू इतकी वायरलेस पॉवर शेरिंगची सुविधा देखील असणार आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांना स्मार्ट वॉच आणि टीडब्ल्यूएस इअर बर्ड्ससारखी उत्पादने चार्ज करता येणार आहेत. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि तेवढ्याच क्षमतेचा अल्ट्रावाइड कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे.
किंमत किती असणार
सदरच्या स्मार्टफोनची किंमत ही 31 हजार ते 36 हजार रुपयांच्या घरात असणार आहे, असे समजते. पण काही संकेतस्थळांवर सवलतीत फोन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पॅनटोन, फॉरेस्ट ग्रे आणि वूड फिनिश या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन येणार असल्याचे समजते.