दिल्लीत कश्मिरी गेट मेट्रो पोलीस स्टेशनला आग

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील कश्मिरी गेट मेट्रो पोलीस स्टेशनला शनिवारी आग लागली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र अनेक कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सरकारी कागदपत्रे, फाईल्स, एसीपी कार्यालय आणि एसएचओ कार्यालयातील सर्व सामान जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांना जवळपास दीड तास मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन […]

दिल्लीत कश्मिरी गेट मेट्रो पोलीस स्टेशनला आग

नवी दिल्ली :
उत्तर दिल्लीतील कश्मिरी गेट मेट्रो पोलीस स्टेशनला शनिवारी आग लागली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र अनेक कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सरकारी कागदपत्रे, फाईल्स, एसीपी कार्यालय आणि एसएचओ कार्यालयातील सर्व सामान जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांना जवळपास दीड तास मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते.