दिल्ली रुग्णालय दुर्घटनेत सातव्या बालकाचा मृत्यू

दिल्ली रुग्णालय दुर्घटनेत सातव्या बालकाचा मृत्यू

नवी दिल्ली :
दिल्लीतील विवेक विहार येथील बाल रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांची संख्या 7 वर पोहोचली आहे. 50 दिवसांच्या मुलीचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापनानेही मुलीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. 25 मे रोजी रात्री रुग्णालयाच्या इमारतीच्या खाली ऑक्सिजन सिलिंडर भरत असताना जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. या अपघातात घटनेच्या दिवशीच 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.