रंग कारखाना आगीत तमिळनाडूत तिघे ठार

रंग कारखाना आगीत तमिळनाडूत तिघे ठार

तिरुवल्लूर :
तामिळनाडूतील तिऊवल्लूर येथील एका रंगनिर्मिती कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला. तसेच दहाहून अधिक कामगार  जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मजुरांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसरा मृत व्यक्ती आग पाहण्यासाठी आला होता. दरम्यान, त्याला आग लागल्यानंतर कारखान्याच्या बाहेर पडलेल्या मेटल प्लेटचा धक्का लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.