आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कारखान्यातील कामगाराचेच

अलीकडेच एका आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी बोट पुण्यातील (pune) इंदापूर (indapur) येथील आईस्क्रीम कंपनीच्या कारखान्यातील कामगाराचे होते. मालाड (malad)पोलिसांना हे बोट 24 वर्षीय ओंकार पोटेचे असल्याची पुष्टी करणारा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारखान्याच्या कामगाराला नोटीस पाठवली जाईल. पोलिसांनी गेल्या शनिवारी रक्ताचे नमुने गोळा केले आणि कोणताही मोठा आजार आहे की नाही हे शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. सोमवारी, पोलिसांना रक्त तपासणीचे निकाल मिळाले, ज्यात असे सिद्ध झाले की कामगाराला कोणताही आजार नाही. 12 जून रोजी, मालाडचे रहिवासी असलेले 26 वर्षीय डॉ. ब्रेंडन फेर्राव यांना त्यांच्या आईस्क्रीममध्ये बोट सापडले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. 13 जून रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), 273 (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) आणि 336 ( वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नंतर युम्मो आईस्क्रीमशी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला. आईस्क्रीम बनवणाऱ्या इंदापूर कारखान्यात एक पथक पोहोचले. इंदापूर येथील नॅचरल डेअरी कंपनीत ड्रायफ्रूट फीडर मशीनमध्ये २४ वर्षीय कामगाराचे बोट कापल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट याच कामगाराचे असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्यावर डीएनए आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आला. 27 जून रोजी पोलिसांना आईस्क्रीम मध्ये आढळून आलेला अंगठा ओंकार पोटे या तेथे काम करणाऱ्या कामगाराचा असल्याचा खात्रीशीर अहवाल प्राप्त झाला. महिन्याभरापूर्वी या आईस्क्रीमची निर्मिती करण्यात आली होती. उत्पादनानंतर, ते हडपसर येथील एका गोडाऊनमध्ये, नंतर साकीनाका येथे आणि नंतर भिवंडीला मालाडच्या गोदामात पोहोचले आणि त्यानंतर ते डॉ. फेराव यांच्याकडे डिलिव्हरी मार्फत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाचा पाच ठिकाणी तपास केला. इंदापूर कारखान्यातील कोणीही अपघाताची अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच नंतर संबंधित कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) पुण्यातील आइस्क्रीम उत्पादकाचा परवाना तपासाअगोदरच निलंबित केला आहे. कंपनीने याआधी फ्री प्रेस जर्नलला एक निवेदन दिले. त्यात त्यांनी असे म्हटले: “उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही आमच्या गोदामांमध्ये प्रभावित उत्पादन वेगळे केले आहे आणि बाजार स्तरावर तसे करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही कायद्याचे पालन करणारी कंपनी आहोत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देऊ.”हेही वाचा महाराष्ट्रातील विधवांना वारसा प्रमाणपत्रासाठी 10 हजार रुपये आकारण्यात येणार विरार-अलिबाग प्रवास होणार वेगवान

आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कारखान्यातील कामगाराचेच

अलीकडेच एका आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी बोट पुण्यातील (pune) इंदापूर (indapur) येथील आईस्क्रीम कंपनीच्या कारखान्यातील कामगाराचे होते.मालाड (malad)पोलिसांना हे बोट 24 वर्षीय ओंकार पोटेचे असल्याची पुष्टी करणारा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारखान्याच्या कामगाराला नोटीस पाठवली जाईल.पोलिसांनी गेल्या शनिवारी रक्ताचे नमुने गोळा केले आणि कोणताही मोठा आजार आहे की नाही हे शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. सोमवारी, पोलिसांना रक्त तपासणीचे निकाल मिळाले, ज्यात असे सिद्ध झाले की कामगाराला कोणताही आजार नाही.12 जून रोजी, मालाडचे रहिवासी असलेले 26 वर्षीय डॉ. ब्रेंडन फेर्राव यांना त्यांच्या आईस्क्रीममध्ये बोट सापडले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. 13 जून रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), 273 (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) आणि 336 ( वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नंतर युम्मो आईस्क्रीमशी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला. आईस्क्रीम बनवणाऱ्या इंदापूर कारखान्यात एक पथक पोहोचले. इंदापूर येथील नॅचरल डेअरी कंपनीत ड्रायफ्रूट फीडर मशीनमध्ये २४ वर्षीय कामगाराचे बोट कापल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट याच कामगाराचे असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्यावर डीएनए आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आला. 27 जून रोजी पोलिसांना आईस्क्रीम मध्ये आढळून आलेला अंगठा ओंकार पोटे या तेथे काम करणाऱ्या कामगाराचा असल्याचा खात्रीशीर अहवाल प्राप्त झाला.महिन्याभरापूर्वी या आईस्क्रीमची निर्मिती करण्यात आली होती. उत्पादनानंतर, ते हडपसर येथील एका गोडाऊनमध्ये, नंतर साकीनाका येथे आणि नंतर भिवंडीला मालाडच्या गोदामात पोहोचले आणि त्यानंतर ते डॉ. फेराव यांच्याकडे डिलिव्हरी मार्फत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाचा पाच ठिकाणी तपास केला. इंदापूर कारखान्यातील कोणीही अपघाताची अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच नंतर संबंधित कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) पुण्यातील आइस्क्रीम उत्पादकाचा परवाना तपासाअगोदरच निलंबित केला आहे. कंपनीने याआधी फ्री प्रेस जर्नलला एक निवेदन दिले. त्यात त्यांनी असे म्हटले: “उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही आमच्या गोदामांमध्ये प्रभावित उत्पादन वेगळे केले आहे आणि बाजार स्तरावर तसे करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही कायद्याचे पालन करणारी कंपनी आहोत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देऊ.”हेही वाचामहाराष्ट्रातील विधवांना वारसा प्रमाणपत्रासाठी 10 हजार रुपये आकारण्यात येणारविरार-अलिबाग प्रवास होणार वेगवान

Go to Source