बिरनाळ तलावामध्ये पाणी भरणा करा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : बिरनाळ (ता. रायबाग) गावामध्ये तलाव असूनही पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावामध्ये 78 एकर जागेमध्ये विस्तीर्ण तलाव असून, तलावामध्ये पाणी भरणा योजनेंतर्गत कालव्यामार्फत पाणी भरण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बिरनाळ ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. रायबाग तालुक्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बिरनाळ गावामध्ये 78 एकर विस्तीर्ण तलाव आहे. या तलावाला हिडकल […]

बिरनाळ तलावामध्ये पाणी भरणा करा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बिरनाळ (ता. रायबाग) गावामध्ये तलाव असूनही पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावामध्ये 78 एकर जागेमध्ये विस्तीर्ण तलाव असून, तलावामध्ये पाणी भरणा योजनेंतर्गत कालव्यामार्फत पाणी भरण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बिरनाळ ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. रायबाग तालुक्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बिरनाळ गावामध्ये 78 एकर विस्तीर्ण तलाव आहे. या तलावाला हिडकल जलाशयातून कब्बूर कालव्यामार्फत पाणी भरणा योजना आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पाणी नसल्याने जनावरांना व ग्रामस्थांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच कूपनलिकांचे पाणीही नाहीसे झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना जनावरांचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यासाठी सदर कालव्यामार्फत तलावामध्ये पाणी भरणा करण्यात यावी. त्वरित याची अंमलबजावणी करण्यात यावी. याला विलंब झाल्यास रायबाग तालुका तहसीलदार कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.