तेलंगणात शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

40 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ, 31 हजार कोटींचा सरकारवर बोजा वृत्तसंस्था/ .हैदराबाद तेलंगणाच्या रेवंत  रेड्डी  सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 2 लाख रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे. या घोषणेचा सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर सरकारी तिजोरीवर 31 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. ही कर्जमाफी 9 डिसेंबर 2023 पूर्वी घेतलेल्या कर्जावर लागू होणार असल्याचे जाहीर […]

तेलंगणात शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

40 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ, 31 हजार कोटींचा सरकारवर बोजा
वृत्तसंस्था/ .हैदराबाद
तेलंगणाच्या रेवंत  रेड्डी  सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 2 लाख रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे. या घोषणेचा सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर सरकारी तिजोरीवर 31 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. ही कर्जमाफी 9 डिसेंबर 2023 पूर्वी घेतलेल्या कर्जावर लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी चालू आठवड्यातच झारखंड सरकारने शेतकऱ्यांची 2 लाख ऊपयांपर्यंतची बिले माफ करण्याची घोषणा केली होती.
शेतकऱ्यांसाठी 2 लाख ऊपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 2 लाख ऊपयांपर्यंतचे कर्ज घेतले आहे, त्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल. लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी सांगितले. मागील बीआरएस सरकारने शेतकऱ्यांची कुचंबना केल्याचा आरोपही त्यांनी केला.
झारखंडमध्ये कर्जमाफीसह मोफत वीज
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनीही नुकतीच राज्यात कृषी कर्जमाफीची घोषणा केली होती. आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले आहे. 31 मार्च 2020 पर्यंत शेतकऱ्यांची 50 हजार ऊपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जे वनटाइम सेटलमेंटद्वारे माफ केली जातील. यासोबतच मोफत विजेचा कोटा 200 युनिटपर्यंत वाढवण्यासाठी त्यांनी बँकांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.