खळबळजनक! पतीने लावलेल्या आगीत पत्नी, दोन मुलींचा जळून मृत्यू

अहमदनगर शहरा जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे.

खळबळजनक! पतीने लावलेल्या आगीत पत्नी, दोन मुलींचा जळून मृत्यू

अहमदनगर शहरा जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पतीने हे कृत्य केले. सुनील लांडगे असे या पतीचे आहे. त्याने पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले.

 

बाहेरून कुलूप लावून घरावर पेट्रोल शिंपडून आग लावून दिली. पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केला. पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू

 

झाला. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली; मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही. दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले. मद्यधुंद असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे.

 

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source