स्थायी समिती अध्यक्षांची आज निवड
महापालिका कौन्सिल विभागाकडून तयारी; सकाळी 11 वाजता प्रक्रियेला प्रारंभ
बेळगाव : महानगरपालिकेतील चार स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात सदस्यांची निवड केली जाते. आता मंगळवार दि. 9 रोजी या स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उपस्थित नगरसेवकांच्या सहमतीनंतर अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम, अर्थ व कर, शिक्षण व आरोग्य आणि लेखा स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्ष निवडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे कामकाज पाहिले जाणार आहे. अध्यक्ष होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. सर्व स्थायी समित्यांवर भाजपचेच अध्यक्ष राहणार, हे निश्चित आहे.
या स्थायी समित्यांसाठी 5-2 फॉर्म्युल्यानुसार सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नवीन नगरसेवकांना यामध्ये संधी देण्यात आली असून त्यामधीलच अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे अनेकांनी वरिष्ठांशी चर्चा करून आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यतत्पर असलेल्या नगरसेवकालाच अध्यक्षपद देण्यासाठी भाजपचे गटनेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उद्या कोणाकोणाला संधी मिळणार, हे समजणार आहे. महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. स्थायी समितीतील सर्व नगरसेवकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांना सकाळी 11 वाजता सभागृहामध्ये हजर रहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या सहमतीने ही निवड केली जाणार आहे. याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.
Home महत्वाची बातमी स्थायी समिती अध्यक्षांची आज निवड
स्थायी समिती अध्यक्षांची आज निवड
महापालिका कौन्सिल विभागाकडून तयारी; सकाळी 11 वाजता प्रक्रियेला प्रारंभ बेळगाव : महानगरपालिकेतील चार स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात सदस्यांची निवड केली जाते. आता मंगळवार दि. 9 रोजी या स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उपस्थित नगरसेवकांच्या सहमतीनंतर अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम, अर्थ व कर, शिक्षण व आरोग्य आणि […]