जुनाट वृक्ष कोसळून कारचे नुकसान

केएलई रोडवरील घटना : वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला बेळगाव : नेहरुनगर येथील केएलई रोडवरील जुनाट वृक्ष कोसळून दोन चारचाकींचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. त्यामुळे रस्त्याशेजारी धोकादायक असलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून बेळगावसह उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून […]

जुनाट वृक्ष कोसळून कारचे नुकसान

केएलई रोडवरील घटना : वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला
बेळगाव : नेहरुनगर येथील केएलई रोडवरील जुनाट वृक्ष कोसळून दोन चारचाकींचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. त्यामुळे रस्त्याशेजारी धोकादायक असलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून बेळगावसह उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्याची भर पडली. यामुळे अनेक जुने वृक्ष व त्यांच्या फांद्या कोसळत आहेत.
पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्षांची यादी तयार करून त्यांच्या फांद्या तोडण्याची मागणी करण्यात आली होती. वनविभागाकडून आता धोकादायक वृक्ष तोडण्याची कार्यवाही सुऊ केली आहे. सोमवारी दुपारी नेहरुनगर येथील केएलई रोडवर मोठा वृक्ष रस्त्यावरच कोसळला. बसस्टॅण्डच्या शेजारी पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या वाहनांवर वृक्ष कोसळल्याने अन्य एका वाहनाचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये कोणी प्रवासी नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. परंतु वृक्ष कोसळला त्यावेळी वाहनांची वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली.