खानापूर रेल्वेस्थानक आवारातील धोकादायक वृक्ष हटवण्याची मागणी

खानापूर : खानापूर रेल्वेस्थानक आवारात असलेला धोकादायक वृक्ष तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे. येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या आवारात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एक धोकादायक वृक्ष गेल्या काही वर्षापासून आहे. हा वृक्ष पूर्णपणे सुकून गेला असून याच्या काही फांद्या वाऱ्याने पडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशाना तसेच पहाटे आणि सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या […]

खानापूर रेल्वेस्थानक आवारातील धोकादायक वृक्ष हटवण्याची मागणी

खानापूर : खानापूर रेल्वेस्थानक आवारात असलेला धोकादायक वृक्ष तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे. येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या आवारात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एक धोकादायक वृक्ष गेल्या काही वर्षापासून आहे. हा वृक्ष पूर्णपणे सुकून गेला असून याच्या काही फांद्या वाऱ्याने पडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशाना तसेच पहाटे आणि सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या वृक्षाची मोठी फांदी काही दिवसापूर्वी भर दुपारी तुटून पडली. गर्दी असूनही मोठा अनर्थ टळला आहे. यासाठी हा वृक्ष रेल्वे प्रशासनाने तातडीने हटवण्यात यावा, यासाठी वनखात्याशी संपर्क साधून तातडीने हा वृक्ष हटवण्यासाठी क्रम घेण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांतून आणि नागरिकांतून होत आहे.