सीमाप्रश्नाच्या लढ्याला मिळणार नव्याने गती!

सीमाप्रश्नाच्या लढ्याला मिळणार नव्याने गती!

तालुका म. ए. समितीतर्फे गाव संपर्क अभियानाला प्रारंभ : सीमालढ्याची देणार तऊणांना माहिती : हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही
वार्ताहर /किणये 
गेल्या 68 वर्षापासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. इथला सीमा बांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी अनेकांनी गोळीबार झेलले आहेत. काही जण हुतात्मे झाले आहेत. बऱ्याच जणांनी तुऊंगवास भोगला आहे. लाठ्या खाल्या आहेत. या साऱ्यांचे बलिदान आपण वाया जाऊ द्यायचे नाही. त्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करणे गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन तऊणांना यामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. तऊणांमध्ये उत्साह पाहता अजूनही सीमा लढ्याला गती मिळणार आहे असे मनोगत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मंडोळी येथे व्यक्त केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावागावातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी   घेऊन गाव संपर्क अभियान सुरू केले आहे. मंडोळी गावात रविवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असताना माजी आमदार मनोहर किणेकर बोलत होते.
म. ए. समितीची पुनर्रचना करणार
बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार 13 जणांची निवड कमिटी केली आहे. या 13 जणांनी व तालुक्यातील नेते मंडळींनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गाव पातळीवर समिती कार्यकर्त्यांची यादी बनवायची आहे. त्यानुसार या अभियानाला मंगळवार रात्री कुद्रेमनी येथून सुऊवात केली आहे. बुधवारी सायंकाळी मंडोळी, हंगरगा व सावगाव येथे समितीच्या लढ्याला बळकटी देण्यासंदर्भात चर्चा केली. अलीकडच्या कालावधीत राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला काहीजण बळी पडू लागले आहेत. म. ए. समितीला लागलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी व सीमालढ्याला पुन्हा बळकटी देण्यासाठी गावागावात सीमा लढ्याबद्दल माहिती देण्यात येत आहे. सीमा भागातील तऊण व काही जाणकार मंडळी आजही समितीच्या झेंड्याखाली आहेत. काहीजण भरकटलेले आहेत. त्यांना पुन्हा समितीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उपस्थित आर. आय. पाटील आर. एम. चौगुले, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. शाम पाटील, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, अनिल पाटील आदींनी आपल्या भाषणातून सांगितले. हंगरगा, मंडोळी व सावगाव या गावातील कार्यकर्त्यांच्या भेटीप्रसंगी यल्लाप्पा रेमाण्णाचे, विठ्ठल पाटील, मनोहर उंद्रे, सुरेश राजूकर, दिलीप कांबळे, कृष्णा हुंदरे, निंगाप्पा मोरे, यल्लाप्पा कणबरकर आदींसह तिन्ही गावातील समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.