दिल्लीचा मुकाबला आज फॉर्मात असलेल्या चेन्नईशी

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविऊद्धच्या आज रविवारी होणार असलेल्या लढतीत पृथ्वी शॉला संघात आणून आपल्या सखोल फलंदाजीची क्रमवारी पुन्हा बदलण्याचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्स बाळगेल असे दिसून येत आहे. या दोन्ही संघांमधील मागील चार सामन्यांत दिल्लीला विजय नोंदविता आलेला नाही. अशा परिस्थितीत सीएसकेविऊद्ध त्यांनी आज विजय मिळविल्यास हा स्पर्धेतील मोठा धक्का मानला जाईल. सीएसके पुन्हा […]

दिल्लीचा मुकाबला आज फॉर्मात असलेल्या चेन्नईशी

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविऊद्धच्या आज रविवारी होणार असलेल्या लढतीत पृथ्वी शॉला संघात आणून आपल्या सखोल फलंदाजीची क्रमवारी पुन्हा बदलण्याचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्स बाळगेल असे दिसून येत आहे. या दोन्ही संघांमधील मागील चार सामन्यांत दिल्लीला विजय नोंदविता आलेला नाही. अशा परिस्थितीत सीएसकेविऊद्ध त्यांनी आज विजय मिळविल्यास हा स्पर्धेतील मोठा धक्का मानला जाईल.
सीएसके पुन्हा एकदा त्याच्या सर्व विभागांत चांगला दिसत आहे, तर रिकी पाँटिंगकडून प्रशिक्षित दिल्लीसाठी चित्र नेमके उलटे आहे. ते खेळाच्या दोन्ही विभागांमध्ये मागे पडले आहेत. दिल्लीच्या मागील सामन्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील फरक पुन्हा एकदा स्पष्ट केलेला आहे. रिकी भुई हा नुकत्याच संपलेल्या मोसमात 902 धावांसह रणजी चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. पण त्याने मागील सामन्यात खराब कामगिरी केली. भुईच्या उणीवा राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने सहज उघड्या पाडल्या.
रणजी स्पर्धेच्या उत्तरार्धात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला शॉ हा पाँटिंग आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या फिटनेस मानकांशी तंतोतंत जुळत नसला, तरी भुईपेक्षा शॉला पसंती मिळू शकते. डेव्हिड वॉर्नर पूर्वीसारखा राहिलेला नाही, तर कर्णधार पंतला सूर गवसण्यासाठी आणखी थोडा काळ जाणार असे वाटते. मिचेल मार्श गेल्या दोन हंगामात सातत्यपूर्ण राहिलेला नाही आणि शॉच्या उपस्थितीमुळे मुस्तफिझूर रेहमान, दीपक चहर, मथीशा पाथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असलेल्या माऱ्याला तोंड देताना दिल्लीच्या फलंदाजीला काही प्रमाणात तरी बळकटी मिळेल.
सीएसकेकडे डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्रच्या रुपाने आणखी गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. जर दिल्लीने शॉला आणले, तर ते मार्शला तिसऱ्या क्रमांकावर पाठवू शकतात. ज्यामुळे वरच्या फळीला थोडी अधिक मजबूती मिळू शकते. दिल्लीची मोठी समस्या म्हणजे त्यांच्याकडे दर्जेदार पॉवर हिटर नाही.  पंत फॉर्ममध्ये येऊ शकलेला नाही आणि शाई होप व ट्रिस्टन स्टब्समध्ये फारसा फरक नाही. त्याचप्रमाणे दिल्लीची शेवटच्या षटकांतील गोलंदाजी देखील चिंतेची बाब आहे आणि अक्षर पटेल वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाने प्रति षटक 7.50 पेक्षा कमी धावा दिलेल्या नाहीत.
संघ : चेन्नई सुपर किंग्ज : एम. एस. धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थीक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रेहमान आणि अवनीश राव अरवेली.
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा आणि शाई होप.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.