दिल्ली कॅपिटल्स आज ‘केकेआर’चे आव्हान पेलण्यास सज्ज

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम चेन्नई सुपर किंग्जविऊद्धचा आपला विजय हा फ्लूक नव्हता हे सिद्ध करण्यास दिल्ली कॅपिटल्स आज बुधवारी उत्सुक असतील, तर कोलकाता नाईट रायडर्सच्या नजरा विजयाच्या हॅटट्रिककडे असतील. आयपीएलमधील आजच्या सामन्यात या दोन्ही संघांची गाठ पडणार अहे. गतविजेत्या सीएसकेविऊद्ध रविवारी येथे 20 धावांनी दणदणीत विजय मिळविल्याने कॅपिटल्सचा संघ जोशात असेल. सीएसकेला रिषभ पंत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी […]

दिल्ली कॅपिटल्स आज ‘केकेआर’चे आव्हान पेलण्यास सज्ज

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
चेन्नई सुपर किंग्जविऊद्धचा आपला विजय हा फ्लूक नव्हता हे सिद्ध करण्यास दिल्ली कॅपिटल्स आज बुधवारी उत्सुक असतील, तर कोलकाता नाईट रायडर्सच्या नजरा विजयाच्या हॅटट्रिककडे असतील. आयपीएलमधील आजच्या सामन्यात या दोन्ही संघांची गाठ पडणार अहे.
गतविजेत्या सीएसकेविऊद्ध रविवारी येथे 20 धावांनी दणदणीत विजय मिळविल्याने कॅपिटल्सचा संघ जोशात असेल. सीएसकेला रिषभ पंत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खेळाच्या सर्व विभागांमध्ये नमविले आणि आज ही विजयाची मालिका पुढे चालू ठेवण्यासाठी कॅपिटल्सला केकेआरविऊद्ध आणखी एक अशीच कामगिरी करावी लागेल. केकेआरच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या गोलंदाजांना निप्रभ करत 29 मार्च रोजी या हंगामातील दुसरा विजय संघाला मिळवून दिला.
दिल्ली कॅपिटल्सतर्फे पृथ्वी शॉ आणि अनुभवी ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नरवर चांगली सुऊवात करण्याची जबाबदारी असेल. पंतने आपला प्रेरणादायी प्रवास सुरूच ठेवला आहे. दोन खराब खेळीनंतर पंतने त्याच्या विध्वंसक क्षमतेची झलक दाखविलेली असून त्याने या मोसमातील पहिले अर्धशतक (32 चेंडूंत 51 धावा) नोंदविलेले आहे आणि हळूहळू तो फॉर्ममध्ये येत असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण आफ्रिकेचे ट्रिस्टन स्टब्स आणि ऑस्ट्रेलियन मिचेल मार्श हे दोघेही प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्यास सक्षम असून त्यांनी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलणे आवश्यक आहे. कारण दिल्लीकडे पॉवर हिटर्सची कमतरता आहे. स्टब्सने राजस्थान रॉयल्सविऊद्ध फलंदाजीत आपला पराक्रम दाखविला होता. त्याच्याकडून सातत्यपूर्ण खेळ झाला, तर दिल्लीला ते फार उपयोगी पडेल. दुसरीकडे, मार्शने अद्याप त्याच्या शक्तीची झलक दाखवलेली नाही
दक्षिण आफ्रिकेच्या एन्रिक नॉर्टजेलाही अद्याप त्याची लय सापडलेली नाही. कारण तो दीर्घकाळ दुखापतीमुळे बाहेर राहावे लागल्यानंतर मैदानात परतला आहे. त्यामुळे ‘केकेआर’चा सामना करताना कॅपिटल्सच्या भारतीय वेगवान गोलंदाजांवर बराच भार असेल. चेन्नईविऊद्ध खलील अहमदची कामगिरी प्रशंसनीय राहिली असली, तरी त्याचे खराब क्षेत्ररक्षण हा चिंतेचा विषय आहे. मुकेश कुमारकडे वेगाचा अभाव आहे, तर अनुभवी इशांत शर्माही काही पूर्वीसारखा राहिलेला नाही.
दुसरीकडे, केकेआरने या मोसमात दोन विजय नोंदवले आहेत. सलामीवीर फिल सॉल्ट, अष्टपैलू आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांसमोर आव्हान उभे करतील. रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरही काही प्रमाणात चमकला. त्यांचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने प्रभावित करताना दोन सामन्यांमध्ये पाच बळी घेतले आहेत. परंतु विक्रमी रकमेला करारबद्ध केलेला मिचेल स्टार्क आणि वऊण चक्रवर्ती यांनी भरपूर धावा दिल्या आहेत.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धूल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगुर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसीख दार, रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा आणि शाई होप.
कोलकाता नाइट रायडर्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रूदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन सकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रेहमान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.