Delhi Bomb Threat : शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता दोन रुग्णालयांना बॉम्ब ने उडवण्याची धमकी
दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता दोन रुग्णालयांना बॉम्बने धमक्या मिळाल्या आहेत. यावेळीही धमकी देणाऱ्या व्यक्तीने जुन्या पद्धतीची पुनरावृत्ती करणारा ईमेल पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धमकीचा मेल संजय गांधी हॉस्पिटल आणि बुरारी हॉस्पिटलला आला असून घटनास्थळी पोलिस, अग्निशमन विभाग, बॉम्ब, श्वान पथक, सर्व नागरी यंत्रणा पोहोचले असून रुग्णालयात बॉम्ब शोधमोहीम सुरु आहे.
अद्याप रुग्णालयातून काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
दिल्लीतील बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मेल द्वारा देण्यात आली आहे. पोलीस दोन्ही रुग्णालयात दाखल झाले असून शोध मोहीम सुरु आहे.
या पूर्वी 1 मे रोजी सकाळीदिल्लीतील 223 शाळांना बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. ईमेलमध्ये घृणास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता.
Edited by – Priya Dixit