CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला.चेन्नईने राजस्थानला पराभूत करून प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या 35 चेंडूत 47 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 18.2 षटकात 5 विकेट गमावत 145 धावा करत विजयाची नोंद केली.

चेन्नईकडून कर्णधार रुतुराज गायकवाडने 41 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दोन बळी घेतले. 

 

या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले असून गुणतालिकेत अव्वल चारमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे,चेन्नई संघ 13 सामन्यांत सात विजय आणि 6 पराभवांसह 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ 12 सामन्यांत 8 विजय आणि 4 पराभवांसह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

 

राजस्थानचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला असता, तर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) नंतर या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ ठरला असता, परंतु चेन्नईने त्याचा पराभव केला.

 

Edited by – Priya Dixit  

 

 

Go to Source