गोदाम बांधकामासाठी अर्जाची 31 जुलैपर्यंत मुदत

गोदाम बांधकामासाठी अर्जाची 31 जुलैपर्यंत मुदत

► प्रतिनिधी
कोल्हापूर
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनीकरिता गोदाम बांधकामासाठी (250 मेट्रीक टन क्षमता) 25 लाख रुपये इतका लक्षांक जिह्यास प्राप्त झाला आहे. जिह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी अर्ज 31 जुलैपूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे. लाभार्थी निवड ऑगस्टमध्ये होईल. अन्नधान्य पिके, कडधान्यासाठी गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येईल. तांत्रिक माहितीसाठी तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.