‘महाडीबीटी’ प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ

‘महाडीबीटी’ प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ

► प्रतिनिधी
कोल्हापूर
2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन प्ttज्s://स्aप्adंtस्aप्aग्t.gदन्.ग्ह संकेतस्थळावर 2023-24 चे अर्ज भरण्यासाठी व 2022-23 तील अर्ज नुतनीकरणासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली. जिह्यातील सर्व महाविद्यालयांनी 2023-24 मध्ये आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर भरुन घ्यावेत. परीपुर्ण अर्ज तात्काळ ऑनलाईन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.