भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उत्तर प्रदेशमधील बरेली मध्ये ड्राईव्हरला झोप अनावर झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. झोपेची झपकी लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे प्रवाशांनी भरली बस थेट झाडावर जाऊन आदळली. 

 

या भीषण अपघातामध्ये एकूण 40 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती अस्थिर आहे. या अपघाताची सूचना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झालेत. हा अपघात आज पहाटे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार बस मध्ये असलेले लोक शामली मधून बाबा रामपाल सत्संग मध्ये सहभागी होऊन लखीमपूर खिरी येथे परतत होते. पण चालकाला झोपेची झपकी लागल्याने बस झाडावर जाऊन आदळली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

 

 

Go to Source