कॅम्प परिसरात रस्त्यांतील चरींमुळे धोका

एलअॅण्डटीकडून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात बेळगाव : कॅन्टोन्मेंट हद्दीतून सहा महिन्यांपूर्वी एलअॅण्डटी कंपनीने जलवाहिन्या घातल्या होत्या. जलवाहिन्या घातल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करत डांबरीकरण करण्यात आले. परंतु माती खचल्याने ठिकठिकाणी चरी पडल्या आहेत. या चरींमुळे धोका निर्माण झाल्याने एलअॅण्डटी कंपनीकडून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एलअॅण्डटी कंपनीने कॅम्प भागातून जलवाहिनी घालण्याची परवानगी दोन वर्षांपूर्वी मागितली होती. […]

कॅम्प परिसरात रस्त्यांतील चरींमुळे धोका

एलअॅण्डटीकडून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात
बेळगाव : कॅन्टोन्मेंट हद्दीतून सहा महिन्यांपूर्वी एलअॅण्डटी कंपनीने जलवाहिन्या घातल्या होत्या. जलवाहिन्या घातल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करत डांबरीकरण करण्यात आले. परंतु माती खचल्याने ठिकठिकाणी चरी पडल्या आहेत. या चरींमुळे धोका निर्माण झाल्याने एलअॅण्डटी कंपनीकडून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एलअॅण्डटी कंपनीने कॅम्प भागातून जलवाहिनी घालण्याची परवानगी दोन वर्षांपूर्वी मागितली होती. परंतु तत्कालीन सीईओ के. आनंद यांनी जलवाहिनी घालण्यास परवानगी दिली नसल्याने अनेक दिवस हे काम रखडले. के. आनंद यांच्या मृत्यूनंतर नव्या सीईओंनी या कामाला परवानगी दिली. कॅम्पमधील हायस्ट्रीट, कॅटल रोड, इंडिपेंडेंट रोड येथे खोदाई करून जलवाहिन्या घालण्यात आल्या. मुख्य बाजारपेठेचा मार्ग असल्याने काही दिवसांतच चरींमध्ये माती भरून तात्पुरत्या स्वरुपात डांबरीकरण करण्यात आले. परंतु महिन्याभरापूर्वी झालेल्या पावसाने चर खचली आणि भला मोठा ख•ा पडला. यामुळे टीकेची झोड उठविण्यात येत होती. रविवारी झालेल्या पावसाने हायस्ट्रीट येथील कॅम्प पोलीस स्टेशनसमोर पुन्हा एकदा चर पडली आहे. यामुळे धोका निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. सोमवारी दुपारपासून पॅचवर्कच्या कामाला एलअॅण्डटी कंपनीने सुरुवात केली आहे. इंडिपेंडेंट रोड, हायस्ट्रीट, कॅटल रोड येथे पॅचवर्कचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.