सीएसआयआर-युजीसी-नेट परीक्षाही लांबणीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘नीट’ आणि ‘नेट’ परीक्षांच्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. ‘एनटीए’ने आता संयुक्त सीएसआयआर-युजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 25 ते 27 जूनदरम्यान होणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती एनटीएने शुक्रवारी रात्री जारी केली. या परीक्षेची नवीन तारीख अधिकृत वेबसाईटवर नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएने जाहीर केले आहे. तसेच उमेदवारांना नवीन अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट देत राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी बुधवारी (19 जून) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.
Home महत्वाची बातमी सीएसआयआर-युजीसी-नेट परीक्षाही लांबणीवर
सीएसआयआर-युजीसी-नेट परीक्षाही लांबणीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘नीट’ आणि ‘नेट’ परीक्षांच्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. ‘एनटीए’ने आता संयुक्त सीएसआयआर-युजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 25 ते 27 जूनदरम्यान होणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती एनटीएने शुक्रवारी रात्री जारी केली. या परीक्षेची नवीन तारीख अधिकृत वेबसाईटवर नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएने जाहीर […]