त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिक-डहाणू रेल्वे प्रकल्पाला वेग

महाराष्ट्रात (maharashtra) रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रेल्वे आणखी एक मोठे पाऊल उचलण्यासाठी सज्ज आहे. नाशिक(nashik) -डहाणू (dahanu road) नवीन रेल्वे (railway) मार्गासाठी हालचालींना वेग आला आहे. नाशिक-डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने एकूण 2.50 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमार्गे नाशिक ते डहाणू हा 100 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रमुख शहरांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराला आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक शहरांना जोडला जाणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात आणि नाशिकमधील पंचवटी (ज्या ठिकाणी प्रभु श्री रामांनी वनवासात मुक्काम केला होता) येथे जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे वाहतूक उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरेल. यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील ज्यामुळे या प्रदेशातील आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल. नाशिक-डहाणू नवीन रेल्वे लिंक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एकूण प्रवासाचा अनुभव वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.हेही वाचा MMR मधील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर प्रवाशांच्या सेवेतमुंबई : महारेरा वेबसाईट दोन दिवस बंद राहणार

त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिक-डहाणू रेल्वे प्रकल्पाला वेग

महाराष्ट्रात (maharashtra) रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रेल्वे आणखी एक मोठे पाऊल उचलण्यासाठी सज्ज आहे. नाशिक(nashik) -डहाणू (dahanu road) नवीन रेल्वे (railway) मार्गासाठी हालचालींना वेग आला आहे.नाशिक-डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने एकूण 2.50 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमार्गे नाशिक ते डहाणू हा 100 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रमुख शहरांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराला आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक शहरांना जोडला जाणार आहे.12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात आणि नाशिकमधील पंचवटी (ज्या ठिकाणी प्रभु श्री रामांनी वनवासात मुक्काम केला होता) येथे जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे वाहतूक उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरेल.यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील ज्यामुळे या प्रदेशातील आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.नाशिक-डहाणू नवीन रेल्वे लिंक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एकूण प्रवासाचा अनुभव वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.हेही वाचाMMR मधील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर प्रवाशांच्या सेवेत
मुंबई : महारेरा वेबसाईट दोन दिवस बंद राहणार

Go to Source