मुंबई : गणेश विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार
यंदा गणेश (ganesh) मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची (artificial pond) संख्या वाढवण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईत (mumbai) 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी भाविकांचा प्रतिसाद वाढत असून गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या संख्येत 371 टक्क्यांनी वाढ झाली आहे.गणेशोत्सव (festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी केली आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी 194 कृत्रिम तलाव असून 76 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही उपलब्ध करून दिली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, अशी विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच घराच्या परिसरात कृत्रिम तलाव असल्याने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे होत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाच्या काळात कृत्रिम तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढली.यावर्षी गुगल मॅपमध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदवली जाणार आहे. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यूआर कोड गणेशमूर्तींच्या मंडपाबाहेरील जागेत लावला जाईल. कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनात 371 टक्के वाढ झाली असून, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिकेने गणेशभक्तांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.भक्तांचा प्रतिसादकृत्रिम तलावांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गेल्या 10 वर्षांत बीएमसीने कृत्रिम तलावांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. 2012 मध्ये केवळ 27 कृत्रिम तलाव होते. गेल्या 10 वर्षात ही संख्या 204 पर्यंत वाढली आहे. 2012 मध्ये 16,276 गणेशमूर्तींचे घरगुती आणि सार्वजनिक विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षी ही संख्या 76,709 होती.हेही वाचाठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढधारावी पुनर्विकासाचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत सुरू होणार
Home महत्वाची बातमी मुंबई : गणेश विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार
मुंबई : गणेश विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार
यंदा गणेश (ganesh) मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची (artificial pond) संख्या वाढवण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईत (mumbai) 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे.
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी भाविकांचा प्रतिसाद वाढत असून गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या संख्येत 371 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गणेशोत्सव (festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी केली आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी 194 कृत्रिम तलाव असून 76 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही उपलब्ध करून दिली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते. त्यामुळे या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, अशी विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
तसेच घराच्या परिसरात कृत्रिम तलाव असल्याने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे होत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाच्या काळात कृत्रिम तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढली.
यावर्षी गुगल मॅपमध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदवली जाणार आहे. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यूआर कोड गणेशमूर्तींच्या मंडपाबाहेरील जागेत लावला जाईल. कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनात 371 टक्के वाढ झाली असून, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिकेने गणेशभक्तांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
भक्तांचा प्रतिसाद
कृत्रिम तलावांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गेल्या 10 वर्षांत बीएमसीने कृत्रिम तलावांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. 2012 मध्ये केवळ 27 कृत्रिम तलाव होते. गेल्या 10 वर्षात ही संख्या 204 पर्यंत वाढली आहे. 2012 मध्ये 16,276 गणेशमूर्तींचे घरगुती आणि सार्वजनिक विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षी ही संख्या 76,709 होती.हेही वाचा
ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ
धारावी पुनर्विकासाचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत सुरू होणार