कमर्शियल सिलिंडर 69 रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एलपीजी ग्राहकांना दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये त्याची किंमत आता 1,676.00 रुपये झाली आहे. यापूर्वी ग्राहकांना 1,745.50 रुपये मोजावे लागत होते. अशाप्रकारे तो 69.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात […]

कमर्शियल सिलिंडर 69 रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एलपीजी ग्राहकांना दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये त्याची किंमत आता 1,676.00 रुपये झाली आहे. यापूर्वी ग्राहकांना 1,745.50 रुपये मोजावे लागत होते. अशाप्रकारे तो 69.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमी झालेले दर शनिवार, 1 जूनपासूनच लागू झाले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी मे महिन्यात 19 रुपये तर एप्रिल महिन्यात 30.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. या दरकपातीमुळे आता 19 किलोचा सिलिंडर कोलकात्यात 1,787 रुपये, मुंबईत 1,629 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,840 रुपयांना मिळणार आहे.