हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता गुरुवारी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. शनिवार दि. 1 जून रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. त्यामुळे तातडीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती केल्यानंतर 1986 मध्ये सीमाभागात त्या विरोधात संतापाचा उद्रेक झाला होता. मराठी जनता रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार […]

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता गुरुवारी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. शनिवार दि. 1 जून रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. त्यामुळे तातडीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती केल्यानंतर 1986 मध्ये सीमाभागात त्या विरोधात संतापाचा उद्रेक झाला होता. मराठी जनता रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केल्याने 9 जण हुतात्मा झाले. त्यांचे स्मारक हिंडलगा येथे उभारण्यात आले आहे. 1 जूनला दरवर्षी त्यांना अभिवादन केले जाते. यावर्षीही अभिवादन करण्यात येणार असून म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मारक तसेच परिसराची स्वच्छता केली आहे.