राज्यात 6, 7 रोजी पावसाची शक्यता

पणजी : राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून येत्या दि. 6 आणि 7 एप्रिल रोजी हलक्या स्वरूपात गोव्यात सर्वत्र पावसाची शक्मयता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गोव्यात सध्या उकाडा वाढला असून भर दिवसा उन्हातून फिरणे कठीण होऊन बसले आहे. सायंकाळी उशिरा हवेत गारवा असल्याचे जाणवते. मात्र दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार […]

राज्यात 6, 7 रोजी पावसाची शक्यता

पणजी : राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून येत्या दि. 6 आणि 7 एप्रिल रोजी हलक्या स्वरूपात गोव्यात सर्वत्र पावसाची शक्मयता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गोव्यात सध्या उकाडा वाढला असून भर दिवसा उन्हातून फिरणे कठीण होऊन बसले आहे. सायंकाळी उशिरा हवेत गारवा असल्याचे जाणवते. मात्र दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तापमान किमान 24 तर कमाल 33.5 डिग्री सेंटीग्रेड एवढेच असते. मात्र हवेतील आद्रता 94 टक्के पर्यंत वाढली असून त्यामुळे उकाडा असह्य होत आहे. या उकाड्यापासून दि. 6 व दि. 7 एप्रिल रोजी हलक्मया स्वरूपातील पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्मयता आहे.