राजस्थानमध्ये सिमेंटने भरलेला ट्रेलर कारवर उलटला, आई-मुलासह 4 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. कारमधील चौघेजण झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी असून ते …

राजस्थानमध्ये सिमेंटने भरलेला ट्रेलर कारवर उलटला, आई-मुलासह 4 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. कारमधील चौघेजण झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी असून ते जयपूरला जात होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर-बिकानेर महामार्गावरील रिंगास येथे हा अपघात झाला असून सिमेंटने भरलेल्या ट्रेलरचे नियंत्रण सुटले आणि पुढे जात असलेल्या कारवर जाऊन पलटी झाली. तसेच पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील चौघेजण झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी असून ते जयपूरला जात होते.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source