बेंगळुरू: सकाळी वॉकला निघालेल्या वृद्ध महिलेवर भटक्या कुत्रांचा हल्ला, महिलेचा मृत्यू
कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी बंगळुरू मध्ये वॉकसाठी निघालेली एका 76 वर्षीय वृद्ध महिलेवर 10 ते 12 कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत महिला ही भारतीय हवाईदलाच्या जवानाची सासू असे. महिलेचे नाव राजदुलारी होते.
सदर घटना बंगळुरूच्या हवाईदल पूर्व 7 व्या निवासी कॅम्प, जलाहल्लीच्या मैदानात 10 ते 12 कुत्र्यांनी अचानक महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला.
सोशल मीडियाच्या x वर एका व्यक्तीने सकाळची घटना शेअर करत लिहिले आहे. आज सकाळी जे पहिले ते अत्यन्त दुःखद आहे. हवाई दलाच्या मैदानात महिलेवर डझनभर कुत्र्यांनी हल्ला केला मी त्यांना मदत पुरवू शकलो नाही. उंच भिंतीमुळे महिलेला कुत्र्यांच्या हल्लापासून वाचवता आले नाही.या व्यक्तीने स्वतःला घटनेचा प्रत्यक्षदर्शी सांगितले आहे.
Edited by – Priya Dixit