डॉक्टरांना तक्रार करण्यासाठी उपाययोजनेची मागणी

वैद्यकीय महाविद्यालयांनी (medical colleges) गुगल ॲप्लिकेशन किंवा मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून डॉक्टरांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडता येतील, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमधील संवाद, त्यांची भाषा, वागणूक यावरून अनेकदा वाद होतात, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कोलकाता (kolkata) येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी केलेला विरोध लक्षात घेऊन केईएम हॉस्पिटलने (hospital) नुकतेच ‘डॉक्टर आणि महिलांवरील हिंसाचार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये डॉक्टरांवर होणारे हल्ले, महिलांवरील अत्याचार यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित निवासी डॉक्टरांनी (doctors) त्यांना भेडसावत असलेल्या समस्या थेट मांडल्या. या चर्चासत्रात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि अधिवक्ता पर्सिस सिधवा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, शैक्षणिक संचालक डॉ. हरीश पाठक आदी उपस्थित होते. डॉक्टरांनी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडून वापरलेली भाषा आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ग्रामीण आणि शहरी वादामुळे डॉक्टरांच्या परस्पर संवादात अडथळे निर्माण होतात.  तसेच, ‘सर’ या शब्दाच्या वापराला अवाजवी महत्त्व दिले जात असल्याने अनेकदा रुग्णालयातील वरिष्ठांकडून ‘रॅगिंग’ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. हा प्रकार कमी करण्यासाठी प्राध्यापकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ.हरीश शेट्टी यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. जेव्हा त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विचारले की त्यांनी कधीही स्वतःचे नुकसान करण्याचा विचार केला आहे किंवा मानसिक आधार मागितला आहे, तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांनी हात वर केले.  यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक खुल्या चर्चेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केईएम रुग्णालयाचे (KEM)अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांनी निवासी डॉक्टरांचे समुपदेशन करण्यासाठी सुरू केलेल्या सेवेचा अनेकांना फायदा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचा ठाणे : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा खंडित नालासोपाऱ्यात 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

डॉक्टरांना तक्रार करण्यासाठी उपाययोजनेची मागणी

वैद्यकीय महाविद्यालयांनी (medical colleges) गुगल ॲप्लिकेशन किंवा मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून डॉक्टरांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडता येतील, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमधील संवाद, त्यांची भाषा, वागणूक यावरून अनेकदा वाद होतात, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.कोलकाता (kolkata) येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी केलेला विरोध लक्षात घेऊन केईएम हॉस्पिटलने (hospital) नुकतेच ‘डॉक्टर आणि महिलांवरील हिंसाचार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये डॉक्टरांवर होणारे हल्ले, महिलांवरील अत्याचार यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित निवासी डॉक्टरांनी (doctors) त्यांना भेडसावत असलेल्या समस्या थेट मांडल्या. या चर्चासत्रात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि अधिवक्ता पर्सिस सिधवा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, शैक्षणिक संचालक डॉ. हरीश पाठक आदी उपस्थित होते.डॉक्टरांनी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडून वापरलेली भाषा आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ग्रामीण आणि शहरी वादामुळे डॉक्टरांच्या परस्पर संवादात अडथळे निर्माण होतात. तसेच, ‘सर’ या शब्दाच्या वापराला अवाजवी महत्त्व दिले जात असल्याने अनेकदा रुग्णालयातील वरिष्ठांकडून ‘रॅगिंग’ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. हा प्रकार कमी करण्यासाठी प्राध्यापकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.मानसोपचारतज्ज्ञ डॉ.हरीश शेट्टी यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. जेव्हा त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विचारले की त्यांनी कधीही स्वतःचे नुकसान करण्याचा विचार केला आहे किंवा मानसिक आधार मागितला आहे, तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांनी हात वर केले. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक खुल्या चर्चेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केईएम रुग्णालयाचे (KEM)अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांनी निवासी डॉक्टरांचे समुपदेशन करण्यासाठी सुरू केलेल्या सेवेचा अनेकांना फायदा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचाठाणे : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा खंडितनालासोपाऱ्यात 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Go to Source