बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार नेटवर्क टॉवर
सल्लागार समितीच्या बैठकीत माहिती
बेळगाव : बीएसएनएल दूरसंचार सल्लागार समिती बेळगावची बैठक सोमवारी संपन्न झाली. या बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. ज्या भागात मोबाईलला नेटवर्क नाही, अशा खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात बीएसएनएल सरकारच्या मदतीने टॉवर उभे करून नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील दोन महिन्यांत 343 नवे 4 जी मोबाईल टॉवर्स उभारले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बेळगाव विभागाचे पीजीएम विकास जयकर यांनी बीएसएनएलच्या कामाबद्दल माहिती दिली. डीजीएम एम. एच. तालीकोटी यांनी बीएसएनएलचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, याची संपूर्ण माहिती दिली. 5 जी कनेक्शनसाठी बीएसएनएलला नवीन सामग्री आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी, बेळगावमधील नागरिकांना दूरसंचार, तसेच इंटरनेटच्या चांगल्या सुविधा बीएसएनएलने उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. या बैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील नेटवर्क संदर्भातील समस्या मांडल्या. यावेळी प्रत्येक तालुक्यातील सल्लागार समितीचे सदस्य, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार नेटवर्क टॉवर
बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार नेटवर्क टॉवर
सल्लागार समितीच्या बैठकीत माहिती बेळगाव : बीएसएनएल दूरसंचार सल्लागार समिती बेळगावची बैठक सोमवारी संपन्न झाली. या बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. ज्या भागात मोबाईलला नेटवर्क नाही, अशा खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात बीएसएनएल सरकारच्या मदतीने टॉवर उभे करून नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील दोन महिन्यांत 343 नवे 4 जी मोबाईल […]