मालविका बनसोडला कास्य पदक
वृत्तसंस्था/नागपूर
टेक्सास येथे नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या अमेरिकन् खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने कास्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत नागपूरच्या 23 वर्षीय मालविकाला उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या निदाराकडून हार पत्करावी लागली. सहाव्या मानांकित निदाराने मालविकाचा केवळ 43 मिनीटांत 21-16, 21-13 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मालविकाने या स्पर्धेत स्कॉटलंडच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या गिलमुरचा पराभव करत आपले कास्यपदक निश्चित केले होते. या स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यानंतर पदक मिळविणारी मालविका ही तिसरी भारतीय बॅटमिंटनपटू आहे.
Home महत्वाची बातमी मालविका बनसोडला कास्य पदक
मालविका बनसोडला कास्य पदक
वृत्तसंस्था/नागपूर टेक्सास येथे नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या अमेरिकन् खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत नागपूरच्या 23 वर्षीय मालविकाला उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या निदाराकडून हार पत्करावी लागली. सहाव्या मानांकित निदाराने मालविकाचा केवळ 43 मिनीटांत 21-16, 21-13 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मालविकाने या स्पर्धेत […]