भाजप रद्द करेल घटना
या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, तर हा पक्ष भारताची घटनाच रद्द करेल, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते पंजाबमधील औद्योगिक शहर लुधियाना येथे एका प्रचारसभेत बुधवारी भाषण करीत होते. त्यांनी या केंद्रशासित प्रदेशातील अंमली पदार्थांची समस्याही गंभीर असल्याचे आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचेही प्रतिपादन केले.
लुधियाना मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमरिंदरसिंग राजा यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. ही लोकसभा निवडणूक घटना वाचविण्यासाठीची आहे. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचाही उल्लेख केला. शेतकरी उत्पादित करीत असलेल्या कृषी उत्पादनांना किमान आधारभूत दराची कायदेशीर हमी देण्याचा आश्वासनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. सध्याची पीक विमा योजना केवळ काही विमा कंपन्यांचा लाभ करुन देत आहे. ही योजना रद्द करण्याची आवश्यकता आहे, असाही आरोप त्यांनी केंद्र सरकारवर भाषणात केला.
Home महत्वाची बातमी भाजप रद्द करेल घटना
भाजप रद्द करेल घटना
या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, तर हा पक्ष भारताची घटनाच रद्द करेल, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते पंजाबमधील औद्योगिक शहर लुधियाना येथे एका प्रचारसभेत बुधवारी भाषण करीत होते. त्यांनी या केंद्रशासित प्रदेशातील अंमली पदार्थांची समस्याही गंभीर असल्याचे आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचेही प्रतिपादन केले. लुधियाना मतदारसंघात काँग्रेसचे […]