नौदलासाठी खरेदी करणार २६ राफेल-एम

नौदलासाठी खरेदी करणार २६ राफेल-एम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नौदलातील युद्धनौकांच्या ताफ्यासाठी फ्रान्सकडून 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार करण्यात येणार आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाच्या करार समितीशी चर्चा करण्यासाठी फ्रान्स सरकार आणि डसॉल्ट कंपनीचे अधिकारी गुरुवारी भारतात येणार आहेत.
राफेल-एम युद्धविमानाच्या संचालनासह त्यातून मारा कसा करावयाचा, त्याबद्दलचे प्रशिक्षणही फ्रान्सकडून देण्यात येईल. संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवाच्या बैठकीत नौदलाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.
22 सिंगल सीट राफेल-एम आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारताकडून खरेदी करण्यात येतील. हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या दबदब्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदी महासागरातच ही विमाने तैनात केली जातील. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर या विमानांचा तळ असेल.
यापूर्वीही भारताने सप्टेंबर 2019 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. 59 हजार कोटी रुपये त्यासाठी मोजावे लागले होते. गुरुवारच्या बैठकीत दरही ठरतील.
अशी आहेत विमाने
लांबी 15.27 मीटर, रुंदी 10.80 मीटर, 5.34 मीटर उंची, तर वजन 10 हजार 600 किलो आहे.
वेग ताशी 1,912 किलोमीटर असून, 50 हजार फूट उंचीपर्यंत ती उड्डाण करू शकतात.
स्की जंपिंग हे अधिक शक्तिशाली इंजिन त्यात आहे.
एकदा उड्डाणात 3,700 कि.मी. अंतर ते कापू शकते.
युद्धनौका तसेच अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात तरबेज आहे.

Go to Source