मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोवा घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 37 व्या गोवा घटकराज्य दिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात डॉ. सावंत म्हणाले की, 30 मे हा गोव्याच्या गौरवशाली इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे कारण या दिवशी 30 मे 1987 रोजी गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले. 30 मे हा गोमंतकीयांच्या वेगळ्या ओळखीचे रक्षण करण्यासाठी गोमंतकीय […]

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोवा घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 37 व्या गोवा घटकराज्य दिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात डॉ. सावंत म्हणाले की, 30 मे हा गोव्याच्या गौरवशाली इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे कारण या दिवशी 30 मे 1987 रोजी गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले. 30 मे हा गोमंतकीयांच्या वेगळ्या ओळखीचे रक्षण करण्यासाठी गोमंतकीय जनता आणि देशभरातील लोकांनी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे. 30 मे हा दिवस महत्वाचा मानला जातो कारण, असंख्य स्वतंत्रसेनानीनी गोवा राज्याचे नशीब घडवण्यासाठी विशेषत: स्वातंत्र्यानंतर आणि गोवा राज्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. जनतेच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे गोव्याने आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले. यानिमित्ताने आपण सर्वजण एकजुटीने, नव्या जोमाने आणि आपल्या छोट्याश्या गोवा राज्याला प्रगती आणि विकासाच्या वाटेवर नेण्याचा निर्धार करून एक जुटीने काम करूया, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.