कुसुम योजनेत बेळगाव आघाडीवर

कुसुम योजनेत बेळगाव आघाडीवर

2284 शेतकऱ्यांची नोंदणी : दुष्काळ परिस्थितीत सौरऊर्जा ठरणार वरदान  
बेळगाव : दुष्काळ परिस्थितीत विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने राबविलेल्या पीएम कुसुम योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी राज्यातून 18 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील 2284 शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पीएम कुसुम योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौरपंप संच उपलब्ध करून दिला जाणार आहे. वेशेषत: यामध्ये केंद्र सरकार 30 तर राज्य सरकार 50 टक्के सवलत देणार आहे. लाभार्थ्यांना केवळ उर्वरित 20 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. एकूणच दुष्काळ आणि उन्हाळी हंगामात अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांना योजना वरदान ठरणार आहे. विशेषत: सौर पंपसेटचा वापर करून दिवसा आठ तास वीजपुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वीजपुरवठा करण्याबाबत चिंता नाही. संबंधित शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, आरटीसी आदी कागदपत्रांसह sदल्ra स्ग्tra.म्दस् या वेबसाईटवर अर्ज करावेत. विशेषत: माहिती उपलब्ध होण्यासाठी 080-22202100 ही हेल्पलाईन सुरू केली आहे.
80 टक्के अनुदान शासनाकडून उपलब्ध होणार
विजेची बचत व्हावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी योजना राबविण्यात आली आहे. विशेषत: 80 टक्के अनुदान शासनाकडून उपलब्ध होणार आहे. केवळ 20 टक्केच रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत आणि विजेची समस्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.