ऑलिम्पिकमध्ये बोपण्णाचा साथिदार बालाजी

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसच्या दुहेरी प्रकारामध्ये भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णाने एन. श्रीराम बालाजीला आपला साथिदार म्हणून निवडला आहे. पॅरिसमध्ये सध्या सुरु असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या सामन्यात श्रीराम बालाजीचा दर्जेदार खेळ पाहून 44 वर्षीय बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपला साथिदार म्हणून निवडला आहे. या निर्णयाला अखिल […]

ऑलिम्पिकमध्ये बोपण्णाचा साथिदार बालाजी

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसच्या दुहेरी प्रकारामध्ये भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णाने एन. श्रीराम बालाजीला आपला साथिदार म्हणून निवडला आहे.
पॅरिसमध्ये सध्या सुरु असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या सामन्यात श्रीराम बालाजीचा दर्जेदार खेळ पाहून 44 वर्षीय बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपला साथिदार म्हणून निवडला आहे. या निर्णयाला अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून कोणताही आक्षेप राहिल, असे मला वाटत नाही. असेही बोपण्णाने म्हटले आहे. या संदर्भात बोपण्णाने हा निर्णय अखिल भारतीय टेनिस संघटनेला लेखी स्वरुपात कळविला आहे. 31 वर्षीय युकी भांब्रीला बोपण्णा ऑलिम्पिकसाठी आपला दुहेरीचा साथिदार निवडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत युकीचे दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.