फिडे मानांकनात इरीगेसी पाचव्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली फिडेच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरीगेसीने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अलीकडेच झालेल्या फ्रेंच सांघिक चॅम्पियनशिप बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुनने दर्जेदार कामगिरी केल्याने त्याची मानांकनात सुधारणा झाली. अर्जुन इरीगेसीने 2769.7 इलो मानांकन गुण आतापर्यंत नोंदवले आहेत. अर्जुनने या मानांकनात गुणात आतापर्यंत 8.7 गुणांची भर घातली आहे. फिडेच्या ताज्या मानांकन यादीत नॉर्वेच्या […]

फिडे मानांकनात इरीगेसी पाचव्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिडेच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरीगेसीने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अलीकडेच झालेल्या फ्रेंच सांघिक चॅम्पियनशिप बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुनने दर्जेदार कामगिरी केल्याने त्याची मानांकनात सुधारणा झाली.
अर्जुन इरीगेसीने 2769.7 इलो मानांकन गुण आतापर्यंत नोंदवले आहेत. अर्जुनने या मानांकनात गुणात आतापर्यंत 8.7 गुणांची भर घातली आहे. फिडेच्या ताज्या मानांकन यादीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन पहिल्या, अमेरिकेचा नाकामुरा दुसऱ्या, रशियाचे केरुना आणि इयान निपोमेनीचीची हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. अर्जुन इरीगेसी पाचव्या स्थानावर आहे. 20 वर्षीय अर्जुनने मेज फिशर बुद्धिबळ क्लबचे प्रतिनिधीत्व करताना पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याने पी. हरिकृष्णा व जर्मनीचा कुनीन यांच्यावर विजय मिळवले आहेत. या स्पर्धेतील दोन फेऱ्या अद्याप बाकी आहेत.