केजरीवालांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रकृतीचे कारण देत केजरीवाल यांनी सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. केजरीवाल यांच्या आजाराची चौकशी तुऊंग प्रशासनाने करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करताना ईडीने केजरीवाल न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा युक्तिवाद केला होता. जामीन मिळाल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावणाऱ्या केजरीवाल यांची प्रकृती शरणागती पत्करण्याची वेळ आली तेव्हा बिघडल्याचा आरोप ईडीने केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन दिला होता. त्यानुसार 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तुऊंगातून सुटका केली होती. त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, 29 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने त्यांच्या याचिकेची तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. या याचिकेत केजरीवाल यांनी आपले वजन कमी होत असल्याने आणि केटोनची पातळी जास्त असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी वेळ हवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर त्याने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीनासाठी विशेष सीबीआय-ईडी न्यायालयात धाव घेतली. 1 जून रोजी त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयाने निकाल राखून ठेवत 5 जून रोजी निर्णय सुनावण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने जामीन फेटाळून लावला.
Home महत्वाची बातमी केजरीवालांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
केजरीवालांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रकृतीचे कारण देत केजरीवाल यांनी सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. केजरीवाल यांच्या आजाराची चौकशी तुऊंग प्रशासनाने करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करताना ईडीने केजरीवाल […]