बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले

बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले

बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले
बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले
बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले

Badlapur School Assault Case: बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २० ऑगस्ट) हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. तसेच आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूरकरांचा आक्रोश; रस्त्यावर उतरले संतप्त नागरिक

बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी नागरिक संतप्त झाले आहेत. शाळेच्या गेटवर असंख्य पालकांनी ठिय्या आंदोलन केलं असून रेल रोकोही करण्यात आला आहे. यामुळे कर्जत-कल्याणदरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.

Devendra Fadnavis On Badlapur School Crime News: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता पालक आणि बदलापूरमधील अनेक नागरिक संतप्त झाले असून ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

बदलापूरमधील या संतापजनक घटनेवर (Badlapur School Crime)  उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अखेर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केलं आहे.

या घटेनंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटले आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर नागरिकांनी तथा पालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. बदलापुरच्या रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. रेल्वे, रिक्षा अडवण्यात आल्या आहेत. कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बंदलापूर बंदच्या दरम्यान आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. अप आणि डाऊनवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादी टाकण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा-

शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *