बदलापूरमध्ये बंदची हाक, संतप्त नागरिक रस्त्यावर
बदलापूर (badlapur) पूर्वेकडील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या (sexual misconduct) घटनेविरोधात संतप्त पालक आणि बदलापूरवासीयांनी मंगळवारी हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर एकच गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच पालक (parents) आणि नागरिकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ही घटना 12 – 13 ऑगस्ट रोजी घडली.दरम्यान, बदलापूर येथे संतप्त जमावाने रेल्वे रुळावर उतरल्याने अंबरनाथ ते कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा प्रभावित झाली आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.दोन मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनाची तारांबळ उडत आहे. तर बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेने सोमवारी माफी मागितली आहे. याप्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबित करण्यात आले. मंगळवारी पालक आणि दक्ष नागरिकांनी शाळेविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच पालक आणि बदलापूरवासीय शाळेबाहेर जमू लागले. सकाळी आठ वाजेपर्यंत हजारो नागरिक शाळेबाहेर रस्त्यावर जमा झाले होते.घटनेचे गांभीर्य दुर्लक्षित करणाऱ्या शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात शहरातील महिला आणि युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आंदोलकांची गर्दी कुळगाव येथील बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या इमारतीपासून थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत पसरली होती. पोलिस प्रशासन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.हेही वाचाकल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी योजना राबवावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकोलकता बलात्कार प्रकरणानंतर मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये अलर्ट
Home महत्वाची बातमी बदलापूरमध्ये बंदची हाक, संतप्त नागरिक रस्त्यावर
बदलापूरमध्ये बंदची हाक, संतप्त नागरिक रस्त्यावर
बदलापूर (badlapur) पूर्वेकडील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या (sexual misconduct) घटनेविरोधात संतप्त पालक आणि बदलापूरवासीयांनी मंगळवारी हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर एकच गर्दी केली होती.
सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच पालक (parents) आणि नागरिकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ही घटना 12 – 13 ऑगस्ट रोजी घडली.
दरम्यान, बदलापूर येथे संतप्त जमावाने रेल्वे रुळावर उतरल्याने अंबरनाथ ते कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा प्रभावित झाली आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.
दोन मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनाची तारांबळ उडत आहे. तर बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेने सोमवारी माफी मागितली आहे. याप्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबित करण्यात आले.
मंगळवारी पालक आणि दक्ष नागरिकांनी शाळेविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच पालक आणि बदलापूरवासीय शाळेबाहेर जमू लागले. सकाळी आठ वाजेपर्यंत हजारो नागरिक शाळेबाहेर रस्त्यावर जमा झाले होते.
घटनेचे गांभीर्य दुर्लक्षित करणाऱ्या शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात शहरातील महिला आणि युवतींचा मोठा सहभाग दिसून आला.
सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आंदोलकांची गर्दी कुळगाव येथील बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या इमारतीपासून थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत पसरली होती. पोलिस प्रशासन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.हेही वाचा
कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी योजना राबवावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोलकता बलात्कार प्रकरणानंतर मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये अलर्ट