अमली पदार्थविरोधी दिनी कारागृहात जागृती

जेएनएमसी डॉक्टरांच्या पुढाकाराने हिंडलगा कारागृहात आयोजन बेळगाव : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल कारागृहात मार्गदर्शन केले.कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश, डॉ. अश्विनी अंगडी, डॉ. सुषमा मेळेद यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. जेलर एफ. टी. दंडयन्नवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी […]

अमली पदार्थविरोधी दिनी कारागृहात जागृती

जेएनएमसी डॉक्टरांच्या पुढाकाराने हिंडलगा कारागृहात आयोजन
बेळगाव : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल कारागृहात मार्गदर्शन केले.कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश, डॉ. अश्विनी अंगडी, डॉ. सुषमा मेळेद यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. जेलर एफ. टी. दंडयन्नवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांवर नाटिका सादर केली.
यावेळी जेलर एस. तोटगी, शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते. अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. अश्विनी अंगडी म्हणाल्या, घातक अमलीपदार्थांच्या सेवनाला आता वयाची मर्यादा राहिली नाही. अनेकांनी या व्यसनापायी आपले जीवन बरबाद करून घेतले आहे. प्रत्येक वर्षी 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन साजरा केला जातो. तरीही जगभरात 10 ते 70 वर्षे वयोगटातील जवळजवळ 16 कोटी लोक वेगवेगळ्या अमलीपदार्थांच्या व्यसनाला चिकटून राहिले आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी या व्यसनांतून लवकर बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.